शिवीगाळ करताना हटकले म्हणून ६० वर्षीय महिलेचा विनयभंग #chandrapur #nagpur

Bhairav Diwase
0

नागपूर:- दारुच्या नशेत शिवीगाळ करताना हटकले म्हणून ६० वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला.पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रंजन जनार्दन कदम (४८, गणेश कॉलनी, प्रतापनगर) असे आरोपीचे नाव आहे. २ एप्रिल रोजी रंजन हा दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. तो संबंधित महिलेच्या घरासमोर पोहोचला व तेथे शिवीगाळ करत घाणेरडे हातवारे करत होता. आवाज ऐकून महिला बाहेर आली व तिने त्याला हटकले. यावरून रंजन संतापला व त्याने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेला पाहून अश्लील हातवारेदेखील केले व महिलेचा विनयभंग केला. महिलेने प्रतापनगर पोलीस ठाण्यात रंजनविरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याा अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)