Top News

वरोऱ्यात काँग्रेसला धक्का; धानोरकर यांच्या पॅनलचा गडातच पराभव #chandrapur #warora


वरोरा:- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शुक्रवारी मतदान होऊन आज निकाल जाहीर करण्यात आले. निवडणूकीत विद्यमान खासदार, आमदार यांच्या शेतकरी विकास पॅनलला धक्का देत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पॅनलने १८ पैकी ९ जागांवर आघाडी घेत विजय मिळविला. शेतकरी विकास पॅनलनी १८ पैकी केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली भाजप, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी एकत्र येत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पॅनल उभी केली होती. या पॅनलने ९ जागा मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेसची सत्ता होती. ही सत्ता कायम राखली जावी यासाठी खासदार, आमदार महोदयांनी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना केवळ ८जागाच मिळविता आल्या. आघाडी गटाच्या पॅनल १८ पैकी ९ जागांवर विजय मिळवून सत्तेच्या जवळ पोहचले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने