चंद्रपुरात मुनगंटीवार आणि वडेट्टीवार यांच्या युतीचा विजय #chandrapur

Bhairav Diwase
0

काँग्रेस आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून एकत्र जल्लोष साजरा


चंद्रपूर:- चंद्रपूर बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 18 पैकी 12 जागांवर भाजप आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलला विजय मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर

तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे समर्थित शेतकरी सहकार पॅनलला ६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे. तर पालकमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीचा विजय झाला आहे. स्थापनेपासून काँग्रेसकडे असलेली चंद्रपूर बाजार समिती आता काँग्रेस (Congress) आणि भाजपच्या (BJP) ताब्यात असले.

या निवडणुकीत अनोखे राजकारण रंगले होते. बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा (Congress) वेगळा पॅनल केला होता. तर भाजपच्या मतदीने विजय वडेट्टीवार यांनी दुसरा पॅनल केला होता. त्यामुळे मुख्य लढत ही काँग्रेसमध्येच झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केला अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)