बचावपक्षाची बाजू मांडत ॲड. राहील खान यांनी केला युक्तिवाद
चंद्रपूर:- फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारावर रामनगर चंद्रपूर पोलीसांनी आरोपी साहिर अहमद साजिद अहमद यांचेवर भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६ (२)(एन), ३४२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाअंती याप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथील न्यायमूर्ती जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयात सर्व साक्षदारांची बयाने नोंदवण्यात आले. त्यानंतर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आल्यावर बचाव पक्षाच्या वतीने ॲड. राहील खान यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणात सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायालयात सादर केलेले पुरावे यावरून न्यायमूर्ती जी. जी. भालचंद्र यांनी निरीक्षणे नोंदवली. ज्यामध्ये फिर्यादीने लावलेल्या आरोपबद्दल सबळ पुरावा नाही. या प्रकरणातील साक्षीदारांची बयाणे विसंगत आहेत. तसेच कोणतेही पुरावे सबळ नाहीत.
त्यामुळे आरोपीवरील आरोप खोटे असून, त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी', असा ॲड. राहील खान यांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत आरोपी साहिर अहमद साजिद अहमद यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल न्यायालयाने दि. १६ मे रोजी दिला व आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.