रात्री खर्रा घेण्यास दुकानात गेला तो परतलाच नाही, मग थेट 'ही' बातमी आली! #Chandrapur #gondiya

Bhairav Diwase

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

गोंदिया:- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील एका 28 वर्षीय युवकाची शेतात जनावरे चारण्यावरुन वाद झाला होता. गावातीलच चंद्रकुमार तुमळे यांच्या शेतात मागील वर्षी जनावरे चरण्यास गेला होता. यावरुन झालेल्या नुकसानीवरून वाद सुरू होता. यावरून गुरुदास रहांगडाले हा रात्री सदर युवक खर्रा घेण्यास गेला असता, तिघा बाप-लेकांनी मिळून या युवकास पकडून त्याच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले.

गुरुदास याला नातेवाईकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरता नेले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला गोंदिया येथे पुढील उपचाराकरीता पाठवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी बापाला आणि एका मुलाला ताब्यात घेतले असून, एक मुलगा अद्याप फरार आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.