Top News

लग्न समारंभातील फटाक्यांची आतिषबाजीने तीन वऱ्हाडी जखमी #chandrapur #Bhandara



भंडारा:- लग्न समारंभात अनुचित घटना घडण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. काहीच दिवसांपूर्वी लग्नात नाचणाऱ्या एका तरुणाला डीजेच्या आवाजाने कायमचा बहिरेपणा आल्याची ताजी घटना असताना आणखी एक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. मंगलाष्टके संपताच वर पक्षांकडील काही अती उत्साही तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. मात्र, त्यांचा हा अतिउत्साह आणि निष्काळजीपणा इतर वऱ्हाड्यांना भोवला. फुटलेले फटाके अंगावर उडून त्यात तीनजण गंभीररित्या जखमी झाले.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, पतीचा बनाव उघड

तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका लग्न समारंभात हा धक्कादायक प्रकार घडला.मनोहर तुमसरे (५०) रा. कुलपा, सुभाष खडोदे (५०) रा.नागपूर,उमेश चाणोरे (४५) सेलोटी, जि. गोंदिया अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यापैकी मनोहर तुमसरे यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशय; भावाने रागाच्या भरात विषयच संपवला!

तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथे राजकुमार जांगळे यांच्या मुलीचा विवाह गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर येथील तरुणाशी २ मे रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यात मंगलाष्टके संपताच वर पक्षाकडील तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत असताना सदर फटाके अचानकपणे मंडप बाहेर उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांच्या अंगावर पडले. यात तीनजण जखमी झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, येथील नागरिकांनी जखमींना उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने