चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये शुक्रवार, 5 मे रोजी बुद्ब पौर्णिमेला पाणवठ्यावर प्राणी गणना होत आहे. मास्टर ब्लास्टर (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकर गुरुवार, 4 मे रोजी सायंकाळी ताडोबा (tadoba) प्रकल्पात पत्नी अंजली व मित्रांसोबत दाखल झाला आहे. #
तेंडुलकर यांचे ताडोबा-अंधारी (Tadobaandhari) व्याघ्र प्रकल्पावर विशेष प्रेम आहे. काही महिन्यांपूर्वीच तो ताडोबा प्रकल्पात पत्नी अंजलीसोबत येऊन गेला होता. तेव्हा सचिनला ताडोबातील वाघांनी दर्शन दिले होते.