माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीच्या स्मृत दिनाचा पडला विसर
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर
चिमूर:- भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची 21 मे 1991 ला सभेदरम्यान मानवी बॉम्ब ने हत्त्या झाली. त्यामुळे काँग्रेस सहित देशातील नागरिक 21 रोजी स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करीत असतात. परंतु याच दिवशी चिमूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने बकरा पार्टी झाल्याने काँग्रेसलाच स्व. राजीव गांधीचा विसर पडला की काय? असे प्रश्न निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते चर्चा करताना दिसत आहेत.
चिमूर तालुक्यातील खडसंगी-मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ता विधानसभेची आस लाऊन बसलेले युवा कार्यकर्ता दिवाकर निकुरे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. आणि या मेळाव्यात चक्क बकऱ्याचे जेवण देण्यात आले. स्वर्गीय राजीव गांधी फक्त काँग्रेस पक्ष्याचे नेते नव्हते तर देशातील युवक व नागरीकांचे ते लाडके व्यक्तिमत्व होते. त्यांच्या मृत्यू संपूर्ण देश हळहळला असताना चिमूर विधानसभेत आमदारकीचे डोहाले लागलेले दिवाकर निकूरे कार्यकर्त्यांना मटणाचे जेऊ घालतात आणि त्या कार्यक्रमाला आदिवासी सेल राज्य अध्यक्ष तथा माजी आमदार नामदेव उसेंडी. एस सी सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्दे उपस्थित होते यावरून खरच काँग्रेस पक्ष राजीव गांधी ना विसरला की काय? अशी चर्चा चिमूर क्षेत्रातील नागरिक करताना दिसत आहेत.