फरार बापलेक वनविभागाच्या जाळ्यात #chandrapur #sindewahi

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्हात मौजा शिवणी येथे शेतशिवारात शिकार स्मारक (अवशेष) मिळाल्याने आरोपी फरार होता. मात्र वनविभागाच्या चमूला सक्रिय कामगिरीने आरोपीला एक महिन्याच्या कालावधीतच पकडण्यात यश आले आहे. सदर प्रकरणातील आरोपी हा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हातील कोरची तालुक्यात सोनपूर या गावात लपून बसले होते. मात्र वनविभागाच्या सक्रिय पथकाच्या कामगिरीने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

प्रकरणातील आरोपीचे नाव मुरलीधर गायकवाड वय 63 वर्ष व सह आरोपी अतुल मुरलीधर गायकवाड वय 33 वर्ष हे दोघेही बापलेक आहेत. आरोपीच्या शोध मोहिमेकरिता रामगावकर क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प चंद्रपूर, कुशाग्र पाठक उपसंचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, बी. सी. येळे सहाय्यक वनसंरक्षक (बफर) यांचे मार्गदर्शनात बी. के. तुपे वनपरीक्षेत्र अधिकारी शिवणी यांचे नेतृत्वात इतर वनधिकारी व वनकर्मचारी सहकार्य केले. तसेच मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट वाघ्र प्रकल्प यांचे अंतर्गत wildlife crime cell यांचे मोलाचे योगदान लाभले. त्याचप्रमाणे आरोपींना मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी सावली यांचे न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी मंजूर करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत