कूलर सुरू करताना लागला शॉक #chandrapur #chimur

ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू


Google ads.

चिमूर:- चावडी परिसर गांधी वार्ड येथील एका ज्येष्ठ नागरिकाने कूलर लावताच, विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दौलत विठोबा सातपुते (६५) असे विजेचा शॉक लागलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी दौलत सातपुते हे नेहमीप्रमाणे कूलर लावण्यासाठी गेले. मात्र, कूलरला हात लागताच, त्यांना विजेचा शॉक लागला. या संदर्भात चिमूर पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांच्यापश्चात मुलगा व मुलगी तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे. उमा नदीच्या घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत