लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनाने घेतला शिक्षकाचा बळी #chandrapur #gadchiroli #accident #aheri


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

गडचिरोली:- सूरजागड खाणीतील लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. (Click here) चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे आलापल्ली चंद्रपूर मार्गावर वनविभागाच्या तपासणी नाक्या समोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आलापल्ली (ता. अहेरी) येथे पोलिस चौकीसमोरच जड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला. ही घटना २० मे रोजी दुपारी पावणे तीन वाजता घडली.

वसुदेव मंगा कुळमेथे (४५,रा.नागेपल्ली ता.अहेरी)असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते एका आश्रमशाळेत कार्यरत होते. ते आलापल्लीहून नागेपल्लीकडे जात होते. आलापल्लीत पोलिस चौकीसमोरच लोहखनीज घेऊन सूरजागडहून आष्टीकडे जाणाऱ्या जड वाहनाने (एमएच ३४ बीझेड-५५८८) दुचाकीला पाठीमागून धडक दिली, यात दुचाकीवरील वसुदेव कुळमेथे हे जागीच गतप्राण झाले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रक अंगावरुन गेल्याने घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक जागेवरच उभा करुन चालक पोलिस चौकीत हजर झाला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रस्त्यावरील ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. वसुदेव कुळमेथे यांचा मृतदेह अहेरी ग्रामीण रुग्णालयात हलविला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत