लग्नानंतर अवघ्या काही दिवसात नवविवाहितेने विहिरीत घेतली उडी #chandrapur #gadchiroli #Chamorshi #suicide

Bhairav Diwase

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

गडचिराेली:- गावालगतच्या शेतातील एका विहिरीत नवविवाहित महिलेने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना चामाेर्शी तालुक्यातील आष्टी पाेलिस स्टेशनांतर्गत येणाऱ्या गुंडापल्ली येथे मंगळवार, दि. २३ मे राेजी दुपारी उघडकीस आली.

हसिना दूधकुंवर (२२, रा. गुंडापल्ली), असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. गुंडापल्ली येथील हसिनाचा विवाह दि. १ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील उंदीरगाव येथील स्वप्नील दूधकुंवर नावाच्या युवकाशी झाला हाेता. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीसोबत माहेरी गुंडापल्ली येथे आली होती. दरम्यान, दोघेही पती-पत्नी एका विवाह समारंभात जाणार होते. परंतु मंगळवारी सकाळच्या सुमारास हसिनाने शौचास जात असल्याचे सांगून गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच आष्टी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.