"मोचा" चक्रीवादळाची आज वर्दी #chandrapur #gadchiroli #nagpur


विदर्भातील "या" जिल्ह्यांना बसणार फटका, वाचा सविस्तर.



Google ads.
नागपूर:- राज्यातील अवकाळी पाऊस जाऊन तापमानाचा पारा पुन्हा वाढत असतानाच आज 'मोचा' या चक्रीवादळाच्या आगमनाची वर्दी हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून उन्हाचे चटके पुन्हा बसायला सुरुवात झाली असताना “मोचा” ने राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे. आज हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. हवामान खात्याने तीन राज्यांना अलर्ट दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत