पोंभूर्ण्यात ट्रिपल आर केंद्राचे नगराध्यक्षाच्या हस्ते उद्घाटन #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0
वापरलेली जुनी पुस्तके, प्लॉस्टीक साहित्य, कपडे, पादत्राणांचा होणार पुनर्वापर

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

पोंभूर्णा:- केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयांनी (MoHUA)मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर हे अभियान पुढील तिन आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत पोंभूर्णा नगरपंचायत येथे ट्रिपल आर सेंटर शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे.यात रिड्यूस,रियुज आणि रिसायकल अशी बहुउद्देशीय संकल्पना या सेंटर मधून राबविल्या जाणार आहे. ट्रिपल आर सेंटर चे उद्घाटन नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.

तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती आकाशी गेडाम,महिला व बाल कल्याण समिती सभापती रोहिणी ढोले,कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सुशांत आमटे,लिपीक रोशन येमुलवार,वासुदेव मडावी, अभियंता महेश्वरी पिंपळशेंडे,प्रदिप पुण्यप्रेडिवार, शहर समन्वयक शशीकांत पिल्लीवार,राकेश बावणे,वंदना गांगरेड्डीवार,शारदा तिरूपत्तीवार,रेणूका बल्लावार,संकोच मानकर यांची उपस्थिती होती. 

ट्रिपल आर केंद्राचे उद्देश शहरातील नागरीकांनी वापरलेली जुनी पुस्तके,प्लॉस्टीकचे साहित्य, कपडे,पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तु गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स म्हणजेच RRR केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रात संकलीत केलेल्या वस्तूंचे नुतणीकरन,पुनर्वापर किंवा नविन उत्पादणे तयार करण्यासाठी विविध भागांना सुपूर्द करणे हा या कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)