व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
चंद्रपूर:- बिबट्याने एका कार्यालयाच्या ताराच्या कुंपनावरून उंच उडी घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या ओमनी चारचाकी वाहनावर हल्ला चढवतो. सुदैवाने ओमनी चारचाकी वाहनाचे काच बंद असल्याने काहीही अनुचित घडला नाही. ओमनी वर हल्ला चढवल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. असा व्हिडिओ एका कार मधील व्यक्तीने घेतला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
थरकाप उडवणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच वायरल होत असुन तो चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सोमनाथ येथील मंदिर परिसरातील असल्याचे सोशल मीडियावर बोलल्या जात आहे परंतु सदर व्हिडिओ कुठला? व केव्हाचा? हे अद्याप कळू शकले नाही.