पोहण्याचा मोह भोवला, दोघांचा बुडून मृत्यू #chandrapur #wardha #death

Bhairav Diwase

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

वर्धा:- पुलगाव येथील एका समारंभात आलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. फैजान अहमद, रा.पुलगाव व अजीज अहमद नासीर अहमद रा.ताजबाग नागपूर अशी मृतांची नावे आहेत.

एक उपचार घेत असून दोघे सुखरूप आहेत. पुलगाव येथे सलिम अहमद यांच्या कडे आयोजित समारंभात नागपूर येथून काही मुलं आली होती. त्यातील पाच पुलगाव लगत असलेल्या गुंजखेडा घाटावरील वर्धा नदीच्या पात्रात पोहण्यास गेले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने फैजान व अजीज या दोघांचा बुडून मृत्यू झाला तेरा वर्षीय मोहम्मद सादिक याला वाचविण्यात यश आले असून त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.पुलगाव पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.