बापरे! वर्धा नदीत बोटीसह चार इसम गेले वाहून #chandrapur #warora

Bhairav Diwase
0

वरोरा:- उन्हाळ्यामध्ये सतत पाऊस पडत असल्याने वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. वरोरा तालुक्यातील दिंडोडा येथील वर्धा नदीवर धरण उभारण्याचे काम सुरू आहे. या कामावरील मजूर बोटीद्वारे पाण्यातून साहित्य काढत असताना बोट उलटली व काही अंतरापर्यंत चारही व्यक्ती वाहत गेले. त्यांना सोईट गावाजवळच्या पुलाजवळ काही नागरिकांनी पाण्यात उतरून पकडल्याने चारही व्यक्ती बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

वरोरा तालुक्यातील दिंदोडा गावानजीकच्या वर्धा नदीवर धरण बांधण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या प्रकल्पात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन जात आहे. प्रकल्प उभारणीकरिता मध्य प्रदेशातील मजूर आणले असून, ते काम सुरू असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. 

मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने वर्धा नदीमध्ये दोन्ही खडीवर पाणी आले आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास प्रकल्प बांधणाऱ्या कंपनीच्या बोटीने चार व्यक्ती नदीच्या पाण्यामधील साहित्य काढत असताना बोट पाण्यात उलटली. यात बोटसह चार व्यक्ती पाण्यात वाहू लागल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे काही नागरिकांनी सतर्कता बाळगत सोईट गावाजवळच्या वर्धा नदीच्या पुलाजवळ पाण्यामध्ये उतरून चारही व्यक्तींना पकडले व सुखरूप बाहेर काढले. चार व्यक्तींची व त्यांना वाचविणाऱ्या नागरिकांची नाव मात्र कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)