खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट #chandrapur

Bhairav Diwase
1 minute read

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथून विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्ली येथे नेण्यात आले आहे. 27 मे रोजी खासदार बाळू धानोरकर यांचे यांचे वडिल नारायण धानोकर यांचे निधन झाले होते. 28 मे रोजी नारायण धानोरकर यांच्या अंत्यविधीमध्येही बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाहीत. मागील 2 दिवसांपासून बाळू धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दि. २८ मे ला प्रकृती काही प्रमाणात खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथील मेदांत रुग्णालयात (https://www.medanta.org/) उपचारासाठी नेण्यात आले. सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत. (Important update on MP Balu Dhanorkar's health)
जाहीर सूचना व आवाहन दि. २९ मे

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बाळू धानोरकर साहेब यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे समाज माध्यमावर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये. मा. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करूया.
खासदार बाळू धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालय, चंद्रपूर