धानोरकर कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट
चंद्रपूर:- चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
दुपारी बाळूभाऊंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा शोक अनावर झाला. रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी येणाऱ्यांची रिघ लागली होती. बुधवारी ३१ मे रोजी वणी-वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी ६ वाजता धानोरकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.