कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष देवतळे म्हणाले, 'राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे न्याय मागणार' #chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती बाजार समितीत तर राजुरा बाजार समितीत आमदार सुभाष धोटे यांनी कॉंग्रेस आघाडीत उमेदवारी दिली आहे. सर्वत्रच अशा आघाड्या झाल्या असतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप कॉग्रेसचे कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला. या कारवाई प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांची प्रत्यक्ष भेट घेवून न्याय मागणार आहे.

प्रकाश देवतळे यांची चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी

चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपाची आघाडी केल्यानंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह विजयोत्सव साजरा करणारे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी कार्यमुक्त केले. हा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासाठी जबर धक्का होता. दरम्यान आज देवतळे यांनी पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्षांची बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केली असल्याचे सांगितले.

मागील नऊ वर्षापासून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून राज्यातील कॉग्रसचे एकमेव खासदार, तीन आमदार, दोन विधान परिषद आमदार तथा जिल्हा परिषदेत कॉग्रेसचे सर्वाधिक सदस्य व आता कॉग्रेसच्या सात बाजार समित्या, ११६ सदस्य निवडून आणले. अशा स्थितीत कॉग्रेसने पाठ थोपटण्याऐवजी केलेली कारवाई योग्य नाही असेही देवतळे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)