Top News

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सचिनला येतेय अर्जुनची आठवण #chandrapur



चंद्रपूर:- सफारी करिता गुरुवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात चार दिवसाच्या मुक्कामी आलेल्या सचिन तेंडुलकरने चुलीवर स्वयंपाक करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत मुलगा अर्जुनची आठवण केली आहे. त्याला मिस करीत असल्याबाबतचा मेसेज पोस्ट केला आहे.
भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फेब्रुवारी महिन्यातच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी करिता येऊन गेलेला आहे. दोन त्यानंतर पुन्हा ते अडीच महिन्याच्या कालावधीनंतर काल गुरुवारी पत्नी अंजली व काही मित्रांसोबत ताडोबात दाखल झाला आहे. काल सायंकाळी व आज शुक्रवारी कोलारा गेटमधून सफारी केली. या भागात प्रस्थ असलेल्या छोटीतारा वाघिणीचे काल आणि आज दोनदा दर्शन झाले आहे. त्यानंतर दुपारी अलिझंझा गेटमधून सफारीला जाण्यापूर्वी अलिझंझा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेऊन सोळा पहिली ते चौथी मधील १६ विद्यार्थ्यांना सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या वतीने सचिनने स्वतःचे हस्ते साहित्यसह स्कूल बॅगचे वितरण केले. मागील सफारीमध्यें शाळेला भेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्याचा शब्द दिला होता. तो शब्दही आज तेंडुलकर यांनी पूर्ण केला.

सायंकाळी सफारी वरुन बांबू रिसार्ट मध्ये मुक्कामी आल्यानंतर मुलगा अर्जुनची आठवण करीत ताडोबातून सोशल मीडियावर (इंस्टाग्राम, फेसबुक) एका खेडेगावातील चुलीवर स्वयंपाक करतानाचा फोटो आणि मेसेज सचिन तेंडुलकर यांनी शेअर केला आहे. क्रिकेटच्या मैदानात शतकावर शतके मारणाऱ्या सचिन आपल्या वयात वयाचं अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचे सेलिब्रेशन काही खास मित्रमंडळींसोबत एका सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टवर सेलिब्रेट केले. जो फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे,त्यामध्ये पत्नी अंजली, मुलगी सारा आणि सचिन तेंडुलकर दिसत आहे. 

ग्रामीण भागातील एखाद्या गावातील स्वयंपाकाच्या चुलीसमोर बसून फुंकणीने चूल पेटविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलगी सारा सुनील चुलीमध्ये काट्या लावत आहे. तर पत्नी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलगा अर्जुन सध्या आयपीएल मध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येते आहे असे देखील त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे. दिवस ताडोबात सफारी करून रविवारी सचिन पत्नी अंजली व मित्रांसोबत परत जाणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने