चंद्रपूर जिल्ह्यात पार पडला प्रेमी युगलांचा 'शुभमंगल सावधान!' #chandrapur #Bramhapuri

घरच्या मंडळीचा लग्नाला विरोध, काय घडलं?


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत खरकाडा येथील पदाधिकाऱ्यांच्या व प्रतिष्ठीत नागरिकांच्या पुढाकारातून प्रेमी जोडप्यांचा विवाह सोहळा दिनांक ५ मे २०२३ ला ०५ वाजता स्थानिक बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराच्या सभामंडपात संपन्न झाला.


प्रफुल्लं हिरालाल गावतुरे(२५) आणि शितल प्रभाकर आदे (२४)असे विवाहबद्ध झालेल्या मुला मुलीचे नाव असून हे दोघेही मुई तालुका ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहेत.

नानाजी तुपट यांचा राजीनामा जिल्हाध्यक्षाने केला नामंजूर

सदर जोडप्यांच्या विवाहासाठी घरच्या परिवाराकडून काहीसा विरोध केला जात होता. त्यामुळे त्यांनी खरकाडा येथील महादेव मंदिरात लग्न लावण्याचा विचार केला त्यासाठी प्रेमीयुगलांनी बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचे अध्यक्ष रवींद्र ढोरे, सचिव योगेश ढोरे, उपाध्यक्ष राजेश्वर पारधी, कोषाध्यक्ष तुकाराम ठाकरे, यांची भेट घेत विवाह लावून देण्याची विनंती केली यावेळी लिव्हींग सर्टिफिकेट, आधार कार्ड व अन्य कागदपत्राची पडताळणी करूनच विवाह सोहळा संपन्न झाला.

ब्रम्हपुरी तालुका आधार न्युज नेटवर्क What'sup group

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिरामण मुळे, बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचे अध्यक्ष रवींद्र ढोरे, सचिव योगेश ढोरे, कोषाध्यक्ष तुकाराम ठाकरे, उपाध्यक्ष राजेश्वर पारधी, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उत्तम बगमारे, उपसरपंच ताराचंद पारधी,मनोज मैंन्द,शांताराम ढोरे,दिगांबर दाणे तसेच महादेव मंदिर देवस्थान कमिटीचे सदस्य तंटामुक्त समितीचे सदस्य ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत