Top News

खासगी रुग्णालयातील २२ वर्षीय परिचारिकेची आत्महत्या #chandrapur


Google ads.

वरोरा:- खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मोनाली संतोष पेंदोर (२२) असे मृत युवतीचे नाव आहे.

मूळची परसोनी येथील मोनाली ही मोकाशी ले-आउट वरोरा येथे मागील वर्षभरापासून तिच्यासोबत खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या अन्य दोन परिचारिकांसोबत राहात होती. एका परिचारिकेची सकाळी ड्युटी होती, तर एक गावाकडे गेली होती. मृतक मोनालीची ड्युटी रात्री असल्याने ती रूमवरच होती. कोणी नसल्याचे बघून तिने गळफास घेतला. सकाळची ड्युटी आटोपून सायंकाळच्या सुमारास ती रूमवर आली असता मोनालीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

याबाबत वरोरा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने