Top News

चंद्रपुरात क्षुल्लक कारणातून मित्रावरच कटरने वार #chandrapur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- क्षुल्लक कारणातून मित्रावरच कटरने वार करून जखमी केल्याची घटना लालपेठ परिसरातील मोहम्मदिया वॉर्डात शुक्रवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान घडली. दोन्ही गटांतील तरुणांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला आहे. पोलिसांनी निसार खान (३५), शहनवाज शेख (३०) या दोघांवर कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर जखमी नवशाद शेख, शेख हबीब यांच्यावर कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A friend was stabbed with a cutter for a trivial reason in Chandrapur)

निसार खान व नवशाद शेख हे मित्र होते. निसारला लकवा मारल्याने तो अपंग झाला आहे. निसारची पत्नी काही कारणास्तव रागावून माहेरी गेली आहे. तिची समजूत काढण्यासाठी निसारने नवशादला सांगितले. यावेळी तुमचा फॅमिली मॅटर तुम्ही बघा, असे नवशाद निसारला म्हणाला. याचा निसारला राग आला होता. शुक्रवारी ते एका कार्यक्रमाप्रसंगी सामोरासामोर आले. यावेळी याच कारणावरून त्याच्यात वाद झाला. यावेळी दोघांत झटापट झाली. निसारने नवशादवर कटरने वार केला. तर, नवशादचा भाऊ मदतीला धावला. त्यानेही मारहाण केली. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी केल्या. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने