टिप्परची स्कुटीला धडक; शिक्षिकेचा घटनास्थळीच मृत्यू #chandrapur#Gondia #death #accident

Bhairav Diwase
0

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

गोंदिया:- तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळेजवळ शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वाळू भरलेल्या टिप्परच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

योगिनी प्रभुराज कुंभलकर (५२) वर्ष असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.कुंभलकर आपल्या स्कुटीने जात असताना अचानक त्यांचा तोल गेला. यामुळे त्या टिप्परच्या मागील चाकाला धडकल्या. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्या सरांडी गावातील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने पकडले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे पाठवण्यात आला.सदर टिप्पर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)