Top News

जिल्ह्यात एकाच रात्री चोरांनी फोडले चार दुकान #chandrapur #chimur #theft


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- चिमूर शहरातील शहिद बालाजी रायपूरकर चौकानजीकच्या चार दुकांनातील दार तोडून शुक्रवारच्या रात्रो चोरट्यांनी सोनुसेल येथुन २ लाख ५५ हजार रुपये रोख चोरली. असांवा वस्त्र भंडार येथुन १ लाख ४० हजार रुपयाचे कपड्याचे गठ्ठे चोराणे चोरूण नेल्याची घटना २७ मे शनिवारला सकाळी १०.०० वाजता उघडकीस आली.
चिमूर शहरातील राष्ट्रिय महामार्गावर असलेल्या सोनु सेल, राजीक वेल्डिंग,असावा वस्त्रभंडार, बालाजी प्रिंटीग प्रेस व बाजुचे गोडाऊन मागील दार चोरांनी फोडल्याचे सकाळी दुकान उघडायला आल्यांनतर दुकानदारांच्या लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली

राजीक वेल्डीग,बालाजी प्रिंटीग या दुकानांची मागील बाजुची दार फोडली मात्र त्यांना रोख किंवा किंमती सामान मिळाले नाही. चोरीची तक्रार चिमूर पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली. घटनास्थळावर पोलिस निरीक्षक मनोज गभने,सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे. यांनी जाऊन पाहणी केली.. चिमूर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने