Chandrapur police: चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली १४ वाहने

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता आणि गस्त आता आणखी तीव्र होणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून (DPC) प्राप्त झालेल्या निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाच्या ताफ्यात १४ नवीन वाहने दाखल झाली आहेत. 


 महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडला. या प्रसंगी जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


या नव्या वाहनांमुळे दुर्गम भागातील गस्त वाढणार असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना अधिक वेगाने घटनास्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. चंद्रपूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल आता अधिक सज्ज झाले आहे.