माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त नोटबुकांचे वाटप chandrapur

Bhairav Diwase

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- माता रमाई म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना माता रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. माता रमाईंचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले. स्मृतिदिनानिमित्त माता रमाईंना विनम्र भावशब्दांजली अर्पण करून माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २७ मे ला चंद्रपूर जिल्ह्यातील सिदूर गावात प्रेरणा निमसरकर आणि निशा धोंगडे यांनी मुलांना पेन व नोटबुकांचे वाटप करण्यात आले.