नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करायला गेले अन् वडाचं झाडचं पेटवून आले #chandrapur #kolhapur #viralvideo #Socialmedia

Bhairav Diwase
0

कोल्हापूर:- आज महाराष्ट्रभरात वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची मागणी करतात. अशातच कोल्हापूरातून एक व्हिडीओ समोर आला आहे.


वटपौर्णिमा करताना वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला आग लागल्यामुळे वडाचं झाड जळत असल्याचं दिसत आहे. कापूर पेटवल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरातील आहे. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत आग विझवली.

अंबाबाई मंदिरात वटपौर्णिमा निमित्त महिलांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान येथे आलेल्या एक महिलेने झाडावर पेटता कापूर टाकला. यामुळे झाडाने पेट घेतला. या घटनेनंतर सर्व महिलांना झाडाजवळून लांब करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)