Top News

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागणार?



चंद्रपूर:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी नुकतेच अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा आता रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर लोकसभेसाठी लवकरचं पोटनिवडणुक जाहीर केल्या जाईल काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. 

"तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची तू वाघिणी”, आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा महाराष्ट्रात एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले होते. त्यांनी माजी मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. अलीकडेच (३० मे रोजी) अल्पशा आजाराने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात खा. धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंद्रपूर लोकसभेची जागा आता रीक्त झाली. त्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे.

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुनर्वापर करण्याजोगे आवश्यक साहीत्य उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. 
यामध्ये शपथपत्र (Form 26), नामनिर्देशित पत्र (Form २A), Form A and Form B, निवडणूक आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र (Form 22), बोटाला लावायची शाई, पिंक पेपर सील आणि ग्रीन पेपर सील यांबाबत तात्काळ आढावा घेऊन अंदाजित मागणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेबरोबरोच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणुक लागणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने