Click Here...👇👇👇

विरुर (स्टे.) येथील कोट्यवधींची आरोग्यवर्धिनी बिनकामी? #Chandrapur #Rajura

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुर(स्टे.) हे आरोग्य केंद्र फक्त एक ईमारत बनून आहे. गोरगरीब, शेतकरी, मजूर लोकांसाठी वरदान ठरेल अशी आशा होती. परंतु वास्तविक पाहता येथील गैरसोयीमुळे गोरगरीब लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण असे की, या दवाखाण्याची OPD वेळ ही स. 09:00 ते 12:00 व सायं. 04:00 ते 05:00 अशी आहे परंतु या ठिकाणी जर सकाळी 12 ला थोडा ऊशिर झाला तरी दवाखाना बंद झाला असे सांगतात नंतर 4 वाजता तर दवाखाना उघडत नाही. संबंधित कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतात. आणि फक्त 3 तास हा दवाखाना चालू असतो. जर अश्या वेळेस एखादा आजारी व्यक्ती तेथे आला तर जीव गमावण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. म्हणून स्थानिक पदाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.