चंद्रपूर पोलीस दलात नव्या दमाच्या पोलीस अमलदार यांची नियुक्ती#chandrapur #police #chandrapurpolice

Bhairav Diwase
0

१७० युवक तर ९० रणरागीणींचा समावेश


चंद्रपूर:- दिनांक 02 जानेवारी, 2023 पासुन पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती- 2021 ची प्रक्रिया सुरु होती ज्यात एकुण 194 पोलीस शिपाई आणि 81 चालक पोलीस शिपाईच्या रिक्त पदांकरीता घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रकियेत एकुण 29221 आवेदन अर्ज ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झाले होते त्यापैकी 24589 पोलीस शिपाई (महिला- पुरुष - तृतीयपंथी) आणि 4632 चालक पोलीस शिपाई (महिला-पुरुष) उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती. मैदानी चाचणीत पात्र एकुण 908 चालक पोलीस शिपाई उमेदवारांची वाहन चालविण्याबाबत कौशल्य चाचणी घेण्यात आली असता लेखी परिक्षा करीता 728 चालक पोलीस शिपाई उमेदवार तर 2139 पोलीस शिपाई पात्र ठरले होते. आणि लेखी परिक्षा अंती उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार, त्यांच्या जातीनिहाय प्रवर्गात उपलब्ध जागांनुसार व समांतर आरक्षण निकषानुसार एकुण 194 पोलीस शिपाई आणि 81 चालक पोलीस शिपाई उमेदवारांसह अनुकंपातत्वावरील एकुण 16 उमेदवारांची वैद्यकीय तपासणी अंती दिनांक 28 मे 2023 पासुन आजपावेतो टप्पाटप्प्याने नियुक्ती देण्यात आली आहे.


आज पावेतो चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर एकुण 125 पुरुष उमदेवार तर 64 महिला उमेदवार तसेच चालक पोलीस शिपाई पदावर एकुण 45 पुरुष उमेदवार तर 26 महिला उमेदवार नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार असे एकुण 260 ताज्या दमांचे नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार रुजू झालेले आहेत.

रुजु झालेल्या अंमलदारांपैकी पुरुष पोलीस अंमलदार यांना पुढील मुलभूत प्रशिक्षणासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापुर आणि महिला पोलीस अंमलदार यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे पाठविण्यात येत आहे. त्यामुळे दि. ३ जून रोजी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु आणि पोलीस उपअधिक्षक (मुख्या ) राधीका फडके यांनी या सर्व नवनियुक्त महिला व पुरुष पोलीस अंमलदारांना त्यांचे मुलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करुन भविष्यात चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचाविण्यासाठी आपले कर्तव्य प्रमाणिकपणा व जबाबदारीने पार पाडण्याबाबत मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)