दहावीच्या परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकुळचे घवघवीत यश #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0


पोंभुर्णा:- दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारीला दुपारी जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. कु. साक्षी सागर देशमुख ही ९१ टक्के गुण संपादन करून शाळेतून पहिली, कु. शेजल गणपती पाल ही ९० टक्के गुण संपादन करून शाळेतून द्वितीय तर रोहित विक्रम देठे हा ८६ टक्के गुण संपादन करून गुणानुक्रमे तिसरा आलेला आहे.

परीक्षेला एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यात ४१ पैकी १३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, २५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. उतीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक पी. एस. निमसरकार सर यांनी अभिनंदन केले. शाळेतील यशवंत विद्यार्थीचे तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांचे तथा शाळेचे परिसरात कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)