आंबेडकरवादी अक्षय भालेराव हत्या विरोधात निषेध मोर्चा #chandrapur #sindewahi


तहसीलदारा मार्फत दिले निवेदन

सिंदेवाही:- तालुक्यात अक्षय भालेराव हत्येचा विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,नांदेड लागत असलेल्या बोंढार गावात डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या कारणावरून मनात राग धरून गावातीलच काही जातीयवादी गावगुंडांनी एका कट्टर भीम सैनिकाची हत्या केली.

अक्षय भालेराव असे आंबेडकरवादी तरुणाचे नाव आहे.विशेष म्हणजे या गावात अजुन पर्यंत भीम जयंती साजरी झाली नव्हती पण बाबासाहेबांचे उपकार,आणि ऋण फेडण्यासाठी हा जन्म पण अपुरा आहे हा मानस मनाशी बाळगत गावातीलच अक्षय भालेराव या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देऊन व निवेदनाची प्रत हातात घेऊन या वर्षी 14एप्रिल ला महामानव क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा केला.पण गावातील काही गावगुंडांनी जयंती साजरी नको होती म्हणून नियोजित कट रचून भीमसैनिक अक्षय भालेराव यांचा हत्याकांड घडवून आणला.

या हत्याकांडाच्या निषेध करत सिंदेवाही येथील विविध संघटनाच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी जनतेच्या सहकार्यातून शिवाजी चौक सिंदेवाही ते तहसील कार्यालयावर दिनांक ७/०६/२०२३रोज बुधवारला निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.या निषेध मोर्चा दरम्यान विविध मागण्या करण्यात आल्यात तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी,गावातील सरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांना त्ताकाळ निलंबित करून त्यांना पण सहआरोपी करावं,नांदेडचे पोलीस निरीक्षक याचे सुद्धा निलंबन त्ताकाळ करावं,मृत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये देऊन घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावं.अश्या विविध मागण्या घेऊन कार्यालय सिंदेवाही येथील तहसीलदार मार्फत मुखमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

निषेध मोर्चामध्ये भीम आर्मी तालुका शाखा सिंदेवाही चे अध्यक्ष अक्षय चहांदे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे,ऑल इंडिया पँथर सेना शाखा सिंदेवाही तालुकाध्यक्ष,आक्रोश खोब्रागडे ,तथागत कोवले युवाध्यक्ष ,बहुजन समाज पार्टी चे रेवानंद बांबोळे,मेश्राम साहेब,वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाउपाध्यक्ष सन्मा.अनिकेत गोडबोले,वंचितचे तालुकाध्यक्ष मुखरू बनसोड, जटा चे मुख्य पत्रकार सुनील गेडाम,मंगेशभाऊ मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते रत्नापुर,कपिल मेश्राम,पत्रकार,तेजेंद्र नागदेवते,वीरेंद्र मेश्राम पत्रकार व सिंदेवाही तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या