वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिकेत गोडबोले यांची निवड #chandrapur #sindewahi


चंद्रपूर:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात वंचित बहुजन समाजाला सत्तेत बसवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून दिवस-रात्र संघटनात्मक बांधणीचे काम चालू आहे. त्याचाच एक भाग वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिकेत गोडबोले यांची निवड करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगाराच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार. युवांना रोजगार नसल्यामुळे जिल्ह्यात अनेक समस्या आहे. बेरोजगारांना अंधारात ठेवण्याचे काम इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले त्यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून लढा उभारणार असा आत्मविश्वास अनिकेत गोडबोले यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा, चंद्रपूर जिल्ह्याचे युवा आघाडीचे निरीक्षक विनय भांगे यांचे अनिकेत गोडबोले यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या