भाजप चे लोकसभा-विधानसभा प्रमुख जाहीर #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून क्षेत्रानिहाय बांधणी सुरुवात केली असून पक्षबांधणी करीता निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राकरीता प्रमोद कडू यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली आहे व चंद्रपूर जिल्हातील सहा विधानसभा प्रमुख पुढील प्रमाणे आहेत.
राजुरा(70) - देवराव भोंगळे
चंद्रपूर (71) - रामदास अंबाटकर
बल्लारपूर(72) - चंदनसिंग चंदेल
ब्रम्हपुरी (73)-अतुल देशकर
चिमूर(74)-गणेश तळवेकर
वरोरा(75)-रमेश राजूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून रमेश राजूरकर यांचे नाव जाहीर झाल्यामुळे त्यांच्या व अशोक जिवतोडे यांच्या लांबलेल्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम मिळाला असून येत्या 13जून ला अधिकृत प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे भाजप प्रदेश कार्यालयातून कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)