चंद्रपूर तालुक्यात "असर सर्व्हेक्षण" पूर्ण #chandrapur

चंद्रपूर:- शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती तपासणीकरीता राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे राज्यात प्रथम फाऊंडेशन तर्फे "असर सर्व्हेक्षण" राबविण्यात आला. ("Asar Survey" completed in Chandrapur Taluk)

चंद्रपूर तालुक्यातील पद्मापूर, शेणगाव, लखमापूर, दाताळा, आरवट, कारवा, शिवणीचोर या सात गावात समाजकार्याचे विद्यार्थी स्वप्नील मेश्राम , चंद्रशेखर ओशाखा यांनी जाऊन मराठी भाषा ५ ते १६ वयोगटातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून डिजिटल स्वरूपात व टॅब द्वारे मराठी भाषेची ओळख, मराठी शब्द, अक्षर, परिच्छेद, गोष्ट, प्रश्न उत्तर अशा स्वरुपात वाचून घेतले.

स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर महाविद्यालयाला 'असर' सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली. असर सर्वेक्षण म्हणजे मराठी भाषा समृध्द होत राहावी, मराठी भाषा आपले अस्तित्व टिकवून राहावी व नव्या पिढीला मराठी भाषेची ओळख व्हावी , विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची तपासणी हा उद्देश या सर्वेक्षणाचा आहे. प्रथम फाऊंडेशन चे समन्वयक भालचंद्र सहारे, प्रा. डॉ. सुभाष गिरडे यांच्या मार्गदर्शनात सर्वेक्षण पूर्ण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत