राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन शिबीराला सुरुवात #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जुनोना तलाव चंद्रपूर येथे मंगळवार 6 जून पासून आपत्ती व्यवस्थापन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. आपले कौशल्य वापरुन उपलब्ध साधनसामुग्रीचा प्रभावी वापर कसा करावा तसेच आपत्कालीन परस्थितीत पिडीत लोंकाना तातडीने कशी मदत पुरवावी याबाबतच्या प्रशिक्षणातून सक्षम जबाबदार भविष्य निर्माण करण्याच्या हेतुने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जून पासून दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 दरम्यान सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये आपत्कालीन परस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व त्याचे महत्व, पिडीत लोकांना जखमी अवस्थेत प्रथमोपचार कसा करावा, सीपीआर केव्हा आणि कोणत्या परस्थितीत कसा द्यावा याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविले व त्याचा सराव प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांचेकडुन करवुन घेतला. पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुरामुळे अनेक गावे प्रभावित होतात. वेळेवर उपस्थित होऊन आपदाच्या वेळेला मदत व पुनर्वसन करण्यासाठी प्रशिक्षित चमूची आवश्यकता असते. चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन व प्रतिसाद दलाच्या चमुने पूर परिस्थितीतील मदत व बचाव कार्य, याबाबत मार्गदर्शन घेतले.

यावेळी इलेक्ट्रॉनिक बोट जूनोना तलावाच्या खोल पाण्यात चालवून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात पूर परिस्थितीत बचाव व आपदग्रस्ताना मदत करावयाची साधने, त्यांचा वापर, संकटात अडकलेल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी वापरावयाच्या विविध उपाय योजना, त्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे, प्रथमोपचार करणे, जखमी नागरिकांची रुग्णालयापर्यंत सुखरूप ने आन करणे याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
या आपदा मित्र प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून जितेश सुरवाडे, मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
बोट चालक राम भवर सिंग हाडा, राजू निंबाळकर राहुल पाटील, ताराचंद मेश्राम, विक्रांत चांभारे, अश्विन गोडबोले, वसीम शेख, राहुल धावडे, तौफीक फिरोज शेख, जुबेर लतीफ शेख, प्रतीक देवलकर आदींची उपस्थिती होती.