संविधान चौकातील ट्रॅफिक सिग्नल सुरू करा.
थानेदार श्री. नागरगोजे यांना दिले राष्ट्रवादीने निवेदन.
राजुरा:- राजूरा येथील संविधान चौकातील व शहरातील अन्य ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली राजूरा पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.
सध्या शाळा-महाविद्यालय सुरू झाले असल्यामुळे निश्चितच शहरामध्ये वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि त्यातच शहरांमध्ये अति वेगाने सर्रासपणे धुमाकूळ घालणाऱ्या नवयुवक वाहन चालकांची संख्या सुद्धा वाढली आहे आणि त्यामुळे भीषण अपघात होण्याची स्थिती नाकारता येत नाही पंचायत समिती जवळील संविधान चौकातील अनेक दिवसापासून बंद असलेले ट्रॅफिक सिग्नल व शहरातील अन्य भागातील ट्रैफ़िक सिग्नल हे लवकरात लवकर सुरू कराल अशी विनंती यावेळी करण्यात आली. अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रखीब शेख, तालुका बूथ कमिटी प्रमुख सुजित कावळे, युवक महासचिव सलमान शेख, जहिर खान, साहिल शेख, राहील शेख उपस्थित होते.