भद्रावती:- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली.यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर उपस्थित होते.यावेळी चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष(शहर) राजीव कक्कड व चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष (ग्रामिण) राजेन्द्र वैद्य यांचे त्यांना सहकार्य लाभले. मुनाज शेख यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत