लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सरपटवार, उपप्राचार्य धारणे #chandrapur #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील लोकसेवा मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.सचिन सरपटवार आणि उपप्राचार्यपदी रुपचंद धारणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रफुल्ल वटे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त प्राचार्य, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी मंडळाच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, संचालक सेवानिवृत्त प्राचार्य गोपालराव ठेंगणे, माजी प्राचार्या आशालता सोनटक्के, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत