सावली:- चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर जोरदार धडक दिल्याने २ जण जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ३ जण गंभीर जखमी झालेले आहेत. दोन्ही दुचाकीवर तीन तीन व्यक्ती बसले होते असे सांगितले जात आहे.
हरीश पांडुरंग सहारे वय 35 रा. नांदगाव तालुका सिदेवाही, सागर रघुनाथ शेडमाके वय 22, राहणार हिरापुर, प्रशांत आत्राम वय 30 वर्ष राहणार हिरापूर तालुका सावली अशी मृत्यू पावणाराची तर जखमींमध्ये अजय विजय गोरडवार वय 32 वर्षे राहणार सावली, सुमित शेडमाके हिरापूर, प्रशांत चावरे नांदगाव गंभीर जखमी आहे.
जखमीना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली सावली पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत. गावातील तरुण मरण पावल्यामुळे हिरापुर आणि नांदगावात शोककळा पसरली आहे.