''स्वच्छता अभियान'' या विषयावर आयोजित वेबिनार संपन्न #chandrapur #spcollegechandrapur

Bhairav Diwase
0

'एचपीसीएल' सोबत सरदार पटेल महाविद्यालयाचा सहभाग
चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभाग, राज्यशास्त्र विभाग, मुंबई येथील एच.पी. शक्ती क्लब व हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत ''स्वच्छता अभियान'' या विषयावर आयोजित वेबिनार कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचपीसीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक विनंती केसरकर या होत्या.

पुनम खुलबे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या की, माणसाने स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आपले घरच नव्हे, तर आपला परिसर, गाव,शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे.आजच्या काळात स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे. सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून मगच तो कचरा पेटीत टाकावा असे त्यांनी नमूद केले.

एचपीसीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक विनंती केसरकर यांनी बोलताना कंपनीच्या वतीने ''स्वच्छता अभियान'' उपक्रमांद्वारे राबविले जात असल्याचे नमूद केले. एचपीसीएल ने सदैव ''सीएसआर'' म्हणजे सामाजिक दायित्वातून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,अंध,मूक-बधिर व निराधारांसाठी सदैव मदतीचा हात दिल्याचे त्यांनी सांगितले. एच.पी. शक्ती क्लब मध्ये ''एचपीसीएल''चे लोक स्वयंस्फूर्तीने, सामाजिक भावनेने योगदान देत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर म्हणाले की, स्वच्छतेच्या बाबतीत सर्वांनीच जागृत राहणे गरजेचे आहे. विदेशात ज्या पद्धतीने स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला जातो, त्याच पद्धतीने आपल्याही देशातही स्वच्छतेच्या बाबतीत आपण सजग असण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रकाश बोरकर, तर आभारप्रदर्शन डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू प्रा.संतोष शिंदे, डॉ.रजनी सिंग यांनी सांभाळली.आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात २५० हुन अधिक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)