जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा (मुले) चिमूर येथे "ग्रिन डे" #chandrapur #chimur

Bhairav Diwase

चिमूर:- चिमूर येथील जिल्हा परीषद केंद्र प्राथमिक शाळा, अभ्यंकर मैदान येथे ग्रिन डे निमित्त सकाळ वृत्त समूहाचे वतीने वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख तुळशिराम महल्ले, प्रमुख अतिथी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपअधिक्षक राकेश जाधव, नगर परिषद, चिमूर मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, पोलिस निरीक्षक मनोज गभने, प्रशासकिय अधिकारी नगर प्रदिप रणखांब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी सातपुते, मुख्याध्यापिका सरिता गाडगे,वर्षा निमजे, रविंद्र बावनकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळेस मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सकाळ वृ्त समूहाचे तालुका बातमीदार जितेंद्र सहारे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सरिता गाडगे यांनी केले.या कार्यक्रमाला पालक अश्विनी सातपुते, अस्मिता सातपुते , संध्या सातपुते, वृंदा दाभेकर कन्पना बनकर इत्यादीसह विद्यार्थी उपस्थित होते.