नवीन हेल्पलाईन क्रमांक सुरू करा #chandrapur #Bhadrawati


भाजयुमोची महावितरणकडे मागणी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- विद्युत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावा अन्यथा भाजयुमो तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांनी महावितरणला नुकताच दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भद्रावती शहरातील विद्युत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. परंतु या क्रमांकावर ग्राहकांनी फोन केला असता ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. अशी तक्रार भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे भद्रावती येथील उपकार्यकारी अभियंता लोहे यांच्याकडे एक निवेदन सादर करून नवीन हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी केली आहे.ही मागणी तीन दिवसांत पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदन सादर करताना इम्रान खान यांच्यासोबत विशाल ठेंगणे, मोनू पारधे, श्रीपाद भाकरे, चेतन स्वान, तोसिफ शेख, अमर महाकुलकर, विकास सुकारे, प्रज्वल नामोजवार, पंढरीनाथ पिंपळकर, मधुकर ताठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या