दीडशे रुग्णाची केली नेत्र तपासणी, 60 रुग्णांवर होणार मोतिबिंदू शस्त्रक्रिय
कोरपना:- दृष्टी आणि दृष्टिकोन या दोन्ही बाबी आयुष्याच्या ज्वलंत रणांगणात अतिशय महत्त्वाच्या आहे.दृष्टी,भौतिक गोष्टींची प्रचिती देते तर दृष्टिकोन प्रचीती आतल्या गोष्टी बाहेर काढून,जीवनाला विषालकोनासारखी विस्तीर्णता प्रदान करतो...
निरंतर जनसेवेचे कार्य करणारे,प्रहार जनशक्ती पक्ष गडचांदुर ,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)वर्धा तसेच माणिकगढ सिमेंट फाउंडेशन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने ,लोकनेते,तळफदार नेतृत्वाचे दमदार आमदार मा. बच्चुभाऊ कडु यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्य आयोजित ,निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 5 जुलै 2023 रोजी गडचांदुर येथे पार पडले.
अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या आरोग्यदायी शिबिराला संपूर्ण सार्थकता लाभली व जनसामान्यांच्या गरजेला प्रहार जनशक्ती पक्ष, गडचांदुर व ग्रामीण रुग्णालय,सावंगी (मेघे) यांचा आधार लाभला.
याप्रसंगी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला,अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालय गडचांदुर चे अधीक्षक,मा. संजयजी घाटे साहेब उपस्थित होते. प्रसंगाला उद्घाटक म्हणून पो. स्टे. गडचांदुर चे ठाणेदार मा.रवींद्र शिंदे यांनी स्थान स्विकारले .कार्यक्रमाचे सह-उद्घाटक राजुभाऊ कादरी व्यासपीठावर होते. व मार्गदर्शक म्हणून मा.हंसराज चौधरी यांची उपस्थिती विलक्षण ठरली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.डाखरे, मा.मनोज भोजेकर,माणिकगढ सिमेंट फाउंडेशन चे अधिकारी मा.राजीव सर व मा.सोनाली मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते...
याक्षणी गडचांदूर पो.स्टे. चे ठाणेदार रवींद्र शिंदे यांनी मोतीबिंदू या आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणाची गरज व्यक्त केली आणि आ. बच्चु कडु यांच्या अपंगांसाठी,शेतकऱ्यांसाठी,वृद्धांसाठी व सामान्य जनतेसाठी सातत्याने होत असलेल्या लौकिक कार्याचा गौरव केला.तसेच प्रहार जनशक्ती पक्ष,गडचांदुर सलग्नित सतिशभाऊ बिडकर व सहकारी यांच्या सातत्याने होत असलेल्या जनसेवेची प्रशंसा केली व शिबिराला आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला गडचांदुर शहरातील व लगत परिसरातील असंख्य नागरिकांनी सहभाग दर्शविला व शिबिराच्या उदिष्टाला संपन्नता आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित कोंडेकर यांनी केले.प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मा .सातिशभाऊ बिडकर यांनी केले तर आभार डॉ.शैलेश विरुटकर यांनी प्रदर्शित केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल प्रहार चे प्रमोद मोहुर्ले ,पंकज मानुसमारे,प्रतिक खैरे,महादेव विश्वास,सुरज बार यांचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यप्रसंगी प्रहार संघटना, गडचांदुर चे सर्व सदस्य, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी(मेघे)येथील डॉक्टर्स टीम,माणिकगढ सिमेंट फाउंडेशन चे पदाधिकारी,समता फाउंडेशन चे सदस्य,परिसरातील बच्चु कडु प्रेमी व असंख्य नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते..💐✨