मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलचा हल्लाचंद्रपूर:- येथील भर वस्तीच्या भागात विद्या विहार शाळेजवळ, छत्रपती नगर येथील रहिवासी प्रेमदास मारोती रामटेके वय ७२ यांच्यावर अस्वलीने जीवघेणा हल्ला केला,
नित्य नियमाने रोज मॉर्निंग वॉक ला प्रेमदास मारोती रामटेके सकाळी ४:३० ला एकटेच निघाले, पावसाळा असल्याने सोबत छत्री होती, विद्या विहार शाळेजवळ वॉटर ट्रीटमेंट प्लांट च्या रस्त्यानी जात असतांना त्यांना अस्वल येतांना दिसली,अचानक अस्वलीने काही कळायच्या आत प्रेमदास रामटेके वर हल्ला चढवला तो हल्ला रामटेकेंनी छत्री मारून परतवला पण सोबत असलेल्या दुसरी अस्वलीने डोक्यावरती हल्ला करून गंभीर जखमी केले,त्या हल्ल्यात ते जमिनीवर पडले,पण रामटेकेंनी पुन्हा छत्रीने अस्वलीला मारले व ती अस्वल पळून गेली, रक्तबंबाळ अवस्थेत रामटेकेंनी घरी फोन करून कळवले व त्यांच्या मुलाला बोलावून घेतले,त्यांच्या मुलांनी प्रवीण रामटेकेंनी सरकारी दवाखान्यात दाखल करून प्रथमोपचार केले, घटनेची माहिती वनविभागाला तुकूम प्रभागातील सतीश नामदेव तायडे जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर यांनी विभागीय अधिकारी श्री.खाडे यांना दिली त्यांनी लगेच आपले कर्मचारी रामटेके यांच्या मदतीला पाठवले.
छत्रपती नगर भागात नेहमीच वन्यजीवांची हालचाल बघायला मिळते,हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे यांनी अस्वलीसोबत दोन पिल्लू असल्याचे सांगितले, wcl चे ढिगारे व लागूनच असलेलं जंगल परिसर असल्याने येथे नेहमीच बिबट, अस्वल, रानटी डुक्कर सांबर दिसत असतात व येथील स्थानिक रहिवासी कचरा ह्याच भागात फेकत असतात ,हल्ला झालेल्या परिसरात महानगर पालिकेचे कचरा निवारण करण्याचे ठिकाण आहे त्यामुळे येथे वन्यप्राणी येत असल्याचे प्रमुख करणे आहे , परिसरात अनेक ठिकाणी रिकामे प्लॉट असल्याने कचरा भरपूर वाढला आहे.
रामटेके यांनी ह्या अगोदर ह्याच परिसरात तीनदा अस्वलीचे दर्शन झाले आहे त्यावेळी अस्वलीने हल्ला केला नव्हता पण त्यांनी सावध झाले असते तर आज हि वेळ आली नसती.

जिल्हा सामान्य रुग्णायात विभागीय अधिकारी श्री.खाडे, डॉक्टर मंगेश गुलवाडे जिल्हाध्यक्ष भाजप, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे उपस्थित होते, विभागीय अधिकारी श्री.खाडे यांनी रामटेकेंची तब्बेतीची विचारपूस करून जखम गंभीर स्वरूपाची असल्याने खाजगी रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येईल असे सांगितले व त्याचा संपूर्ण खर्च वन विभाग करेल असे त्यांच्या मुलाला प्रवीण रामटेके ला सांगण्यात आले, पुढील उपचारासाठी गुलवाडे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यासाठी सतीश नामदेव तायडे यांनी रुंगवाहीका बोलवून गुलवाडे यांच्या दवाखान्यात दाखल करवून घेत पर्यंत सोबत होते. विभागीय अधिकारी श्री.खाडे यांनी हल्ला झालेल्या परिसरात गस्त वाढवून आणखी हल्ले होऊ नये ह्याच्यासाठी निदर्शने फलक व कुणीही अंधारात फिरायला जाऊ नये असे आव्हाहन तेथील नागरिकांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या