Click Here...👇👇👇

सुरज पेदूलवार यांची जिल्हास्तरीय नियंत्रण समितीवर निवड #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- समाजकल्याण विभाग चंद्रपुर अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दिव्यांग व्यक्तीसाठी राखिव ठेवण्यात येणाऱ्या निधीचे जिल्हास्तरीय नियंत्रण समिती मध्ये सुरज पेदुलवार यांची अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे.

सुरज पेदुलवार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महाविद्यालयीन जीवनात असताना नागपूर युनिव्हर्सिटी 2014 - 15 मध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. याशिवाय लोकसभा खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार निवडणुकीदरम्यान कॉलेज ब्रँड ॲम्बेसेंडर म्हणून देखील काम केलेले आहे. 2014 मध्ये निवडणुकीसाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
2012 ते 2016 या कालावधीमध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्टेट कमिटी मेंबर आणि जिल्हा समन्वयक म्हणून देखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. याशिवाय नुकत्याच 2022 मध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान सामाजिक कार्य केले. त्यासाठी विदर्भ बेलदार समाजाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला होता. दिव्यांग व्यक्तींच्या उत्थानासाठी शासनाकडून येणाऱ्या निधीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हास्तरीय नियंत्रण समिती कार्यरत असते. या समितीवर त्यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल मित्रपरिवारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.