सकाळी फिरायला जाणाऱ्यांना सतिश तायडे यांचं आवाहन #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- जंगल परिसर लागून असल्याने अनेकदा वन्यजीव शहरी भागात शिरकावं करत आहे आणि वन्यजीवांचे मानवावर हल्ले होत आहे, ह्या घटना टाळण्यासाठी आपण सावध असायला पाहिजे, त्याच्यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन सकाळी फिरायला जाणाऱ्यांना सतीश नामदेवराव तायडे जिल्हा सचिव भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर यांनी केले आहे.

1.नागरिकांनी सकाळी फिरायला जात असतांना उजेडातच निघावे, अंधारात जाऊ नये.

2. फिरायला जातांना समूहात जावे,एकट्याने जाऊ नये.
3. संध्याकाळच्या सुमारास लहान मुलांना घराजवळ नजरेसमोर च खेळू द्यावे जेणेकरून लक्ष राहील व काही अपरिचित घटना घडणार नाही.

4. परिसरात स्वछता ठेवावी, कचरा, अन्न पदार्थ कचरापेटीतच टाकावे, इतरत्र कुठेही टाकू नये, टाकाऊ पदार्थावर वन्यप्राणी आकर्षित होऊन उकीरड्यावर येऊ शकतात, परिणामी मानवी वस्तीत वन्यप्राणी असल्याने वन्यप्राण्यांचे हल्ले होणाऱ्या घटना घडू शकतात.

5. वन्यप्राणी दिसल्यास लांब राहा, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, त्याला त्रास देऊ नका, असे केल्यास तो प्राणी स्वरक्षणासाठी तुमच्यावर हल्ला करू शकतो.

6. वन्यप्राणी दिसल्यास वनविभागाला, स्थानिक वन्यजीव संस्थेला फोन करून त्याची माहिती द्या.
हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटी
दिनेश खाटे (अध्यक्ष)
मो.+91 97640 92920

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)