पाणीपुरी खाल्ल्यावर नर्सिंगच्या विद्यार्थीनीचा मृत्यू; दोन विद्यार्थीनीवर उपचार सुरू #chandrapur #nagpur #panipuri


नागपूर:- नागपुरातील मेडिकल या शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यु झाल्यानं खळबळ उडाली आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. तर आणखी दोन विद्यार्थिनीना त्रास झाला आहे.

मृतक विद्यार्थीनी जम्मू कश्मिरची रहिवासी आहे. विशेष म्हणजे पाणीपुरी खाल्ल्यानंतर या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. त्यानंतर रात्री तिला ओकारी आणि अतिसार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी तिने मेडिकलमधून औषधोपचार घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी तिला ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने ऍडमिट न होता हॉस्टेलमध्ये औषधी घेऊन राहणे पसंत केलं. त्यामुळं प्रकृती खालावत असल्याने ५ जुलैला तिला रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालवली आणि गुरूवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

दोन विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

सदर घटनेमुळे तिला पाणीपुरीतून विषबाधा झाली की काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोस्टमार्टेम अहवालानंतर मृत्युचं नेमके कारण कळेल. दरम्यान तिच्या सोबतच्या आणखी दोन विद्यार्थीनिंना पाणीपुरी खाल्ल्याने अतिसाराचा त्रास झाल्यानं दोघींना मेडीकलमध्ये भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत